दक्षिण मुंबईत रामराज्य हवे असेल, तर महायुतीशिवाय पर्याय नाही!

    11-May-2024
Total Views |

Lodha 
 
मुंबई : "असे म्हणतात की, प्रभू श्रीरामांनादेखील रावणाचा वध करावा की, नाही असा संभ्रम होता. कारण रावण ज्ञानी आहे, धार्मिक आहे असे अनेकांनी त्यांना सांगितले होते. विवेक बुद्धीने प्रभू श्रीरामांनी योग्य तो निर्णय घेत आपल्या धनुष्यबाणाने रावणाचा वध केला, म्हणून आज रामराज्य आले. आजच्या युगात तुमच्यासमोर देखील धनुष्यबाणाच्या सहाय्याने दक्षिण मुंबईमध्ये रामराज्य आणायची संधी आहे. त्यामुळे विकासासाठी, आपल्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन यामिनीताईंना विजयी करूया," असे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
 
९ मे २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतून महायुतीच्या अधिकृत उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे भोईवाडा येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी राज्यसभा खासदार मिलिंद देवरा, मनसे नेते बाळा नांदगावकर, इतर मान्यवर मंडळी यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  काही लोकं बडबड करत सुटले तर...; फडणवीसांचा ठाकरेंना टोला
 
राज ठाकरे हे नेहमीच मराठी माणसासाठी लढणारे एक लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्यासोबत असलेले जीवाला जीव देणारे साथीदार ही त्यांची सर्वात मोठी कमाई आहे. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवडण्यासाठी राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे महाराष्ट्रात महायुतीची ताकद अधिक मजबूत झाली आहे, असेदेखील याप्रसंगी बोलताना कॅबिनेट मंत्री लोढांनी सांगितले.