छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा! उबाठा आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने

    11-May-2024
Total Views |

Mahayuti & UBT 
 
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार रॅलीदरम्यान उबाठा गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. या दोन्ही गटात हाणामारी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात निवडणूकीला गालबोट लागल्याचे पाहायला मिळत आहे.
 
शनिवारी छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात महायुतीआणि उबाठा गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. या दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली आहे. तसेच याठिकाणी कार्यकर्त्यांकडून एकमेकांना हाणामारीही करण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? -  "काँग्रेस आणि उबाठाला मतदान करण्यासाठी मशिदीतून फतवे!"
 
येत्या १३ मे रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक होणार आहे. याठिकाणी महाविकास आघाडीकडून उबाठा गटाचे चंद्रकांत खैरे तर महायुतीकडून शिवसेनेचे संदीपान भुमरे उमेदवार आहेत. त्यामुळे याठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे असा थेट सामना रंगणार आहे. मात्र, आज निवडणूकीच्या चौथ्या टप्याच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून हा राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपुर्ण परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे.