ग्राहकांसाठी जिओची आकर्षक ऑफर :१५ + कंटेंट सेवा प्रति महिना ८८८ रुपयांत

या नव्या बंडलमध्ये नेटफ्लिक्सचा प्राथमिक प्लान, डिस्नी हॉटस्टार, अमेझॉन प्राईम लाईट व इतर अँपचा समावेश

    11-May-2024
Total Views |

Jio
 
 
मुंबई: आता जिओने शुक्रवारी ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. आता ओटीटी प्रेमींसाठी आनंदाची बातमी असून टेलिकॉम सेवा व ओटीटी सेवा यांचे परिपूर्ण पॅकेज घेऊन रिलायन्सने नवी ऑफर आणली आहे. या नव्या बंडलमध्ये नेटफ्लिक्सचा प्राथमिक प्लान, डिस्नी हॉटस्टार, अमेझॉन प्राईम लाईट व इतर अँप असे एकूण १५ अँपचे सबस्क्रिप्शन असलेली सेवा (३० एमबीपीएस स्पीडसह )युजर्ससाठी रिलायन्स जिओने लाँच केली आहे.८८८ रुपये या प्लानची किंमत असणार आहे.
 
जियो फायबर धारकांना नेटफ्लिक्सचा एक्सेस आधी मिळणार आहे. एंट्री लेव्हल प्लानमध्ये (३० मेगाबीट पर सेकंद) यामध्ये मनोरंजन अँपचा समावेश असणार नसल्याने कंपनीने म्हटले आहे.याशिवाय जिओचा एअर फायबर ग्राहकांना १४९९ रुपयांच्या प्लानमध्येच नेटफ्लिक्सचा समावेश असणार आहे.
 
याविषयी बोलताना कंपनीने म्हटले आहे की,'अमर्यादित डेटा फायद्यांसह अंतिम स्ट्रीमिंग अनुभव प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले नवीन पोस्टपेड प्लॅन आहेत ज्याची किंमत ८८८ रुपये प्रति महिना आहे, JioFiber आणि Jio AirFiber ग्राहकांसाठी हे उपलब्ध आहे. यामध्ये ग्राहकांना लोकप्रिय १५ हून अधिक आघाडीच्या ओटीटी ॲप्समध्ये विशेष प्रवेश मिळतो.नेटफ्लिक्सची मूलभूत योजना, ॲमेझॉन प्राइम आणि जिओसिनेमा प्रीमियम सारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत'
 
कंपनींच्या माहितीप्रमाणे,हे प्लान प्रिमियम कंटेंटसह येणार आहेत ज्यामध्ये सोनी लिव, लायन्सगेट, डिस्कवरी प्लस, अल्ट बालाजी या कंपन्यांचा यामध्ये समावेश असणार आहे.