पटोलेंच्या वादग्रस्त विधानावर हनुमानगढीच्या पुजाऱ्यांचे प्रत्युत्तर

    11-May-2024
Total Views |

Nana Patole - Mahant Raju Das

मुंबई (प्रतिनिधी) :
“आतापर्यंत काँग्रेस पक्ष फक्त राम मंदिरालाच विरोध करत असे, पण आता काँग्रेस पक्ष आदिवासी आणि दलित समाजाचाही अपमान करू लागला आहे, हे दुर्दैव आहे,” असे म्हणत हनुमानगढीचे मंदिर पुजारी (Hanumangadhi Pujari ) महंत राजू दास यांनी पटोलेंच्या विधानावर उत्तर दिले आहे.

हे वाचलंत का? : हिंदू नेत्यांना धमकावणाऱ्या मोहम्मद अलीला बिहारमधून अटक!


महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अयोध्येतील राम मंदिराबाबत वादग्रस्त विधान केले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अयोध्या दौऱ्यादरम्यान रामललाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर पटोलेंनी केलेल्या विधानामुळे राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही राजकीय वादळ निर्माण झाल्याचे दिसते आहे. 



एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना महंत राजू दास म्हणाले की, त्यांचे वक्तव्य दुर्दैवी असून असे वक्तव्य करून दलित समाजाचा अपमान करणे भारतासाठी अत्यंत धोकादायक आहे. काँग्रेस पक्ष ज्याप्रकारे आदिवासी, दलित आणि मागासलेल्या लोकांचा अपमान करत आहे, त्याचे उत्तर जनता नक्कीच मागेल.'