सायबर क्राईम पोलिसांची मोठी कारवाई! ४० हजार सिमकार्ड, १८० फोन जप्त; अब्दुल रोशनला अटक!

    11-May-2024
Total Views |

Cyber Crime Police

तिरुवनंतपुरम :
केरळच्या मलप्पुरम सायबर क्राईम पोलिसांनी (Cyber Crime Police) ऑनलाइन रॅकेटमधील प्रमुख आरोपी समजल्या जाणाऱ्या अब्दुल रोशनला अखेर अटक केली आहे. या कारवाईत ४० हजारहून अधिक सिमकार्ड, १८० मोबाईल फोन आणि सहा बायोमेट्रिक रीडर पोलिसांनी जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सायबर फसवणूक झालेल्या संशयित व्यक्तींकडून ओटीपी संदेश प्राप्त करण्यासाठी फोन आणि सिमकार्डचा वापर केला. रोशनच्या नेटवर्कचा भाग असलेल्या मोबाईल शॉप्सने ग्राहकांच्या नकळत त्यांच्या बोटांचे ठसे गोळा केले आणि सिमकार्ड सक्रिय करण्यासाठी त्यांचा वापर केला. रोशनने असे सिमकार्ड प्रत्येकी ५० रुपयांना विकत घेतले होते. ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांसाठी वापरल्या जाणाऱ्या राज्यातील सिमकार्डचा हा सर्वात मोठा पल्ला आहे.