'म्हाडा'त महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा

वांद्रे पूर्व येथील म्हाडा कार्यालयाच्या प्रांगणात संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी

    11-May-2024
Total Views |

mhada


मुंबई,दि ११ : प्रतिनिधी 
म्हाडा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने वांद्रे पूर्व येथील म्हाडा कार्यालयाच्या प्रांगणात गुरवार दि.९ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि प.पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी दुपारी कर्मचाऱ्यांच्या पाल्याना वह्या वाटप आणि म्हाडा कर्मचारी संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित म्हाडा कर्मचाऱ्यांना इतिहास अभ्यासक प्रा.विक्रमसिंह मगर यांनी आदरांजली पर मार्गदर्शन केले. यावेळी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुख्य अभियंता धीरजकुमार पंदीरकर,सचिव राजकुमार सागर ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे,झोसू मंडळाचे मुख्य अधिकारी रविंद्र पाटील, कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे, आर आर बोर्डाचे सह मुख्य अधिकारी उमेश वाघ,उपमुख्य अभियंता किशोरकुमार काटवटे,अनिल अंकलगी सह संतोष खरात,अतुल देसाई पांडुरंग गवळी सुधीर मारकड,शरद केदारे,संतोष भोसले,उमेश माळी,दीपक सराफ, दर्शना कोळी,सीमा मोटे,कस्तुरी परब आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर विचारे तर सूत्रसंचालन सरचिटणीस एस के भंडारे यांनी केले.सायंकाळी दिगंबर नाईक आणि सोनाली पाटील यांचे 'बाई वाड्यातून जा' हे विनोदी नाटक संपन्न झाले.