रायपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. विजापूरमध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये १२ नक्षलवादी ठार झाले आहेत. हा एन्काऊंटर ठाण्यांतर्गच पे़डिया गावाजवळ झालाय. नक्षलवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा जवानांचे पथक मोहिम राबवत होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी जवळच्या जंगलातून गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले. घटनास्थळावरून १२ हून अधिक नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.
या कारवाईत एकही सुरक्षा कर्मचाऱ्यांना मोठी दुखापत झाली नाही. पंरतु दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. याआधी कांकेड येथे झालेल्या चकमकीत २९ नक्षलवाद्यांचा एन्काऊंटर झाला होता. तसेच लेंद्राच्या जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी १३ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. यातील अनेकांना नक्षलवाद्यांवर पोलीसांनी बक्षीस जाहिर केले होते. राज्यात सरकार बदलल्यानंतर नक्षलविरोधी कारवाई तीव्र झाली आहे.
नुकतेच झालेल्या एन्काऊंटर बद्दल मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले, “आमच्या जवानांना नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत मोठे यश मिळाले आहे. चकमक संपली असून, १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. मी अधिकारी आणि जवानांचे अभिनंदन करतो. आम्ही सत्तेत आल्यापासून नक्षलवादाच्या विरोधात जोरदार लढा देत आहोत. केंद्र सरकारलाही छत्तीसगडमधून नक्षलवाद संपवायचा आहे. आम्हाला डबल इंजिन सरकारचे फायदे मिळत आहेत,असे ही ते म्हणाले.
छत्तीसगडचे गृहमंत्री आणि कावर्धाचे आमदार विजय शर्मा यांनी सांगितले की, डीआरजीची विजापूर आणि दंतेवाडा टीम, कोब्रा बटालियन आणि एसटीएफ मिळून १००० च्या संख्येने शोधासाठी निघाले होते. ते म्हणाले की, आयईडीने धडक दिल्याने एका सैनिकाला किरकोळ दुखापत झाली आहे. नक्षलवादाचा प्रश्न चर्चेने सोडवला पाहिजे, विकास बस्तरपर्यंत पोहोचला पाहिजे, बस्तरच्या लोकांना ओलीस ठेवू नये, बंदुकीच्या जोरावर शाळा, रुग्णालये बांधू नयेत, असे ते म्हणाले. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवीन पुनर्वसन योजना तयार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.