बाबासाहेब पुरंदरेच्या ‘फुलवंती’वर रुपेरी पडद्याची नजर

चित्रपट सृष्टीला पडली बाबासाहेब पुरंदरेंच्या लेखणीची भुरळ

    10-May-2024
Total Views |
 
babasaheb purandare
 
मुंबई : सुप्रसिद्ध इतिहासकार आणि कादंबरीकार म्हणून मान्यता मिळवलेले कै. बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीचे कौतुक त्यांच्या मृत्युपश्चातही होतंय. त्यांचे शिवचरित्र गाजले आणि केवळ पुस्तक नाही तर विविध रूपातून रसिकांच्या भेटीला आहे. आता नुकतेच त्यांच्या फुलवंती पुस्तकावर चित्रपट येतो आहे. पॅनोरमा स्टुडिओज आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी हे एकत्र 'फुलवंती' ही भव्य कलाकृती घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत. प्राजक्ता माळी यानिमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहे. या चित्रपटाचे लेखन-संवाद प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. पखवाज आणि घुंगरांच्या जुगलबंदीचं ‘फुलवंती’ चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालं आहे.
 
कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रसिद्ध छायाचित्रणकार महेश लिमये यांनी छायाचित्रणाची तर संगीताची जबाबदारी अविनाश-विश्वजीत यांनी सांभाळली आहे. मंगेश पवार अँड कं आणि शिवोsहम क्रिएशन्स प्रा.लि.निर्मित ‘फुलवंती’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.