उबाठांच्या सभेवर वरुणराजा नाराज! सभा रद्द

    10-May-2024
Total Views |
UBT
 
पुणे : पुण्यामध्ये अनेक ठीकाणी आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाच्या शक्यतेचा अंदाज हवामान खात्याने यापुर्वी वर्तवला होता. त्यानुसार राज्यातील अनेक भागत अवकाळी पावसाची हजेरी लागण्याती शक्यता आहे. गेले अनेक दिवस पुण्यातील तापमानाने उच्चांक गाठला होता. या पावसामुळे उकाड्यापासुन पुणेकरांची सुटका झाली आहे. परंतु राजकीय पक्षांच्या प्रचारसभांवर मात्र या पावसाचा विपरीत परीणाम पाहायला मिळतो आहे.
 
पुण्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, याच्या आज पुण्यात सभा आयोजित करण्यात आल्या होत्या पण आता या सभा होतील की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरम्यान अजित पवार यांची पारनेरमधील सभा ही भर पावसात पार पडली. तेथुन ते पुणे येथे सभा घेणार आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सभांना मात्र मोठा फटका बसला आहे.
 
पावसामुळे मविआच्या सभा रद्द होत आहेत. जालना येथेही पावसाने हजेरी लावल्याने उद्धव ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे जालन्याचे णहाविकासआघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी जाणार होते. छत्रपती संभाजीनगरवरुन हॅलिकाँप्टर प्रवास पावसात शक्य नसल्याने जालना येथिल उद्धव ठाकरेंची सभा रद्द करण्यात आली आहे.
 
पुण्यासोबतच महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्यापासुन जरी तुर्तास सुटका झाली असली असली तरी शेतीवर याचा विपरीत परीणाम होण्याची शक्यता आहे. नगर, सांगली आणि छत्रपतीसंभाजीनगर भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्रासोबतच मराठवाडा, आणि विदर्भातही अनेक ठीकाणी वादळी वाऱ्यांसह, पाऊस आणि गारपिटींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.