रोहिंग्यांकडून सामूहिक बलात्कार; हजारो आदिवासी महिला रस्त्यावर उतरल्या

    10-May-2024
Total Views |

Adivasi Mahila Purush

मुंबई (प्रतिनिधी) :
रोहिंग्या घुसखोरांनी (Rohingya) केलेल्या सामूहिक बलात्कार आणि हल्ल्यातील पीडितांना त्वरित न्याय मिळावा, या मागणीसाठी हजारो महिला-पुरुष आसाम-मेघालय सीमेवर हसुरामध्ये रस्त्यावर उतरले होते. हजारो कोंच राजबंशी आणि हाजोंग जमातीच्या महिलांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५ हजार लोकांनी मेघालयातील अम्पती जिल्ह्याच्या जिल्हा आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी अल्पवयीन पीडितांना न्याय मिळावा यासाठी गुन्हेगारांना त्वरित अटक करावी अशी विनंती केली आहे. तसेच अवैध घुसखोरांपासून स्वदेशी लोकांच्या सुरक्षिततेची मागणीसुद्धा आंदोलकांनी केली आहे.

हे वाचलंत का? : बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्यांना प्रोत्साहन हाच काँग्रेसचा अजेंडा!

आसाम-मेघालय सीमेवरील दक्षिण पश्चिम गारो हिल्स (SWGH) येथे एका संशयित रोहिंग्या मुस्लिम टोळीने चेंगा बेंगा परिसरात वार्षिक जत्रेतून परतणाऱ्या २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. एका अल्पवयीन मुलीवर २० हून अधिक संशयित रोहिंग्यांनी सामूहिक बलात्कार केला, तर मुलीसोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला अमानुषपणे मारहाण करून झाडाला बांधून ठेवले. या टोळीने आणखी एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केला आणि पीडितेसोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला टोळीने बेदम मारहाण केली होती.