सत्तेत आल्यास पहिले राम मंदिराचे शुद्धीकरण करणार : नाना पटोले

    10-May-2024
Total Views |

Nana Patole on Ram Mandir

मुंबई (प्रतिनिधी) :
महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole on Ram Mandir) यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराबाबत वादग्रस्त अतिशय वादग्रस्त विधान केले आहे. देशात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर राम मंदिराचे शुद्धीकरण होईल!, असे म्हणत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बोट ठेवल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच चारही शंकराचार्यांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकल्याचा दावा त्यांनी केला आहे. वास्तविक शृंगेरी आणि कांची मठ यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे स्वागत करणारी निवेदने जारी केली होती.

हे वाचलंत का? : शिकागोत भारतीय विद्यार्थी २ मे पासून बेपत्ता!

नाना पटोले म्हणाले, "शंकराचार्य यांचे सनातन धर्माचे प्रमुख आहेत. ते राम मंदिराच्या आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विरोधात आहेत. पंतप्रधान नरेंद्र अधर्माच्या आधारावर केलेले हे काम आहे. त्यामुळे इंडी आघाडीचे सरकार आल्यावर राम मंदिराचे शुद्धीकरण नक्कीच होईल. तसेच याठिकाणी राम दरबार तयार केला जाईल" राम मंदिरातील रामललाच्या मूर्तीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.