देश विरोधी प्रवृत्तींना नष्ट केल्याशिवाय आमच्यासारखा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही- कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

    10-May-2024
Total Views |
 M P lodha
 
मुंबई : "देश विरोधी प्रवृत्तींना नष्ट केल्याशिवाय आमच्यासारखा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. देशाच्या विकासासाठी, दक्षिण मुंबईच्या विकासासाठी येथील बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या यांना बाहेर काढू. येथील नागरिकांना, मराठी व्यासायिकांना, भूमिपुत्रांना त्यांचे हक्क मिळायला हवेत. बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या यांच्या घुसखोरीने भूमिपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही. दक्षिण मुंबईचे मालवणी होऊ देणार नाही" आज परळ येथे भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आपले विचार व्यक्त केले. सदर मेळावा महायुतीच्या उमेदवार श्रीमती यामिनी जाधव यांच्या लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आयोजित करण्यात आला होता.
 
या कार्यक्रमात मलबार हिल विधानसभा क्षेत्रात सुरु करण्यात आलेल्या महायुतीच्या निवडणूक कार्यालयाचे ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन केले गेले. सदर मेळाव्यामध्ये कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेना नेते यशवंत जाधव उपस्थित होते. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
 
भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना पुढे मंत्री लोढा म्हणाले, "निवडणूक झाल्यानंतर सुद्धा आपण कोणीही स्वस्थ बसून चालणार नाही नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू! निवडणुकांनंतर प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही येऊ, आपल्या समस्य ऐकून घेऊ, त्यासाठी आपण जनता दरबार भरवू! माझ्याकडे कौशल्य विकास विभागाची जबाबदारी असल्याने त्यामुळे प्रत्येक वॉर्डमधील १० मुलांना दर महिन्याला रोजगार मिळेल, त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण त्यांना मिळेल हे लक्ष्य आपण ठेऊ. दक्षिण मुंबईमध्ये जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाची समस्या देखील मोठी आहे ते लक्षात घेऊन पुढील एका वर्षात पुनर्विकासाचा मार्ग सोयीस्कर करण्यासाठी आपण युद्धपातळीवर कार्य करू. जे विश्वगुरू भारताचे स्वप्न स्वामी विवेकानंदानी पाहिले होते, ते पूर्ण करण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊया, या स्वप्नाची पूर्तता करण्याची सुरुवात दक्षिण मुंबईपासून करूया, यामिनी ताईंना प्रचंड मताने विजयी करूया!"
 
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभा लोढा यांच्याद्वारे दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंत्री मंगल प्रभात लोढा नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या समजून घेत आहेत, महायुतीला मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन करत आहेत.