उपराष्ट्रपतींनी सहपरिवार घेतले रामललाचे दर्शन

    10-May-2024
Total Views |
ram mandir

मुंबई :  उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शुक्रवार, दि. १० मे रोजी सहपरिवार अयोध्येत रामललाचे दर्शन घेतले. दुपारी सर्वप्रथम त्यांनी हनुमान गढी येथे मारुतीरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर राम मंदिर येथे श्री रामलला चरणी ते नतमस्तक झाले. संध्याकाळी सर्व परिवाराने मिळून शरयू नदीची आरती केली. गुरुवारपासूनच स्थानिक प्रशासन उपराष्ट्रपतींच्या आगमनाच्या तयारीला लागले होते. दरम्यान राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासचे महामंत्री चंपत राय व अन्य सदस्यांसह उपराष्ट्रपतींची बैठकही संपन्न झाली.

ram mandir