मार्च २०२४ मध्ये औद्योगिक उत्पादनात ' इतकी' वाढ

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने औद्योगिक उत्पादन वाढल्याचे स्पष्ट केले

    10-May-2024
Total Views |

Industrial Production
 
 
मुंबई: भारताच्या औद्योगिक उत्पादनात वाढ झाल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार देशाच्या औद्योगिक उत्पादनात मार्च महिन्यात ४.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (IIP) मध्ये मार्च २०२३ मध्ये १.९ टक्क्यांनी वाढ झाल्याचे या आकडेवारीत म्हटले आहे.
 
मार्च २०२४ मध्ये भारताचा औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकात ४.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे असे अहवालात म्हटले आहे. देशाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (National Statistics Office) विभागाने दिलेल्या आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
उत्पादन क्षेत्रात (Manufacturing Sector) मधील उत्पादन मार्च २०२४ मध्ये ५.२ टक्क्यांनी वाढले आहे. जे गेल्या वर्षाच्या मार्चमध्ये १.५ टक्क्यांनी कमी होते. याशिवाय खाण उत्पादनात १.२ व उर्जा उत्पादनात ८.६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.