शिकागोत भारतीय विद्यार्थी २ मे पासून बेपत्ता!

    10-May-2024
Total Views |

Indian Student in US
Indian Student in USA

मुंबई (प्रतिनिधी) :
अमेरिकेतील शिकागोमध्ये गुरुवार, दि. २ मे पासून एक भारतीय विद्यार्थी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले की, रूपेश चंद्र चिंताकिंडीशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात असून ते पोलीस आणि भारतीय डायस्पोरा यांच्या संपर्कात आहेत. शिकागो पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार रूपेश हा एन शेरीडन रोडच्या ४३०० ब्लॉकमधून बेपत्ता झाला होता. तरी तो सापडल्यास पोलिसांना त्वरीत कळवावे, असे आवाहनदेखील पोलिसांनी लोकांकडे केले आहे.

हे वाचलंत का? : जय भोलेनाथ! केदारनाथ धाम येथून महत्त्वाची अपडेट

मार्चपासून बेपत्ता असलेला एक भारतीय विद्यार्थी अमेरिकेच्या ओहायो राज्यात एप्रिलच्या सुरुवातीला मृतावस्थेत आढळून आला होता, असे न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले. तसेच श्री मोहम्मद अब्दुल अरफाथ, ज्यांच्यासाठी शोधमोहीम चालू होती, ते क्लीव्हलँड, ओहायो येथे मृतावस्थेत सापडले होते. मूळचे हैदराबादचे रहिवासी असलेले अराफत मे २०२३ मध्ये क्लीव्हलँड विद्यापीठातून आयटी विषयातील पदव्युत्तर पदवीसाठी अमेरिकेत गेले होते परंतु ७ मार्चपासून ते बेपत्ता होते.