IPO Update: १५ मे पासून गो डिजिट कंपनीचा आयपीओ येणार

२५८ ते २७२ प्रति समभाग प्राईज बँड निश्चित

    10-May-2024
Total Views |

ipo
 
 
मुंबई: गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची नवीन संधी आली आहे. शेअर बाजारात १५ ते १७ मे याकाळात गो डिजिट कंपनीचा आयपीओ बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल होत आहे. ही कंपनी बीएसई (BSE) व एनएसई (NSE) या दोन्ही बाजारात २३ मे २०२४ पर्यंत नोंदणीकृत होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २३ मे पर्यंत समभागाचे वाटप करण्यात येईल.
 
कंपनी ४.१४ कोटींचे समभागांचा फ्रेश इश्यू गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. कंपनींच्या माहितीप्रमाणे या आयपीओसाठी कंपनीने प्राईज बँड २५८ ते २७२ प्रति समभाग निश्चित केलेला आहे. गुंतवणूकदारांना आयपीओ विकत घेण्यासाठी कमीत कमी ५५ शेअरचा वाटा (Lot) खरेदी करावा लागणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) कमीत कमी एकूण १४९६० मूल्यांचे समभाग गुंतवणूकदारांना विकत घ्यावं लागतील.
 
पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Buyers) साठी एकूण आयपीओचा ७५ टक्के हिस्सा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non Institutional Investors) साठी आयपीओतील १५ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना सहभागाचे वाटप २१ मे पर्यंत करण्यात येणार असून अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा २२ मे पासून करण्यात येणार आहे. या कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) कमलेश गोयल आहेत.
 
२०१६ साली स्थापन झालेली कंपनी विमा (Insurance)पुरवठा करणारी कंपनी आहे. ही कंपनी पर्यटन विमा, आरोग्य विमा, मोटर विमा, संपत्ती विमा, व इतर विमांची सेवा पुरवते. ३१ मार्च २०२३ पर्यंत कंपनीचा महसूल ११३.३५ टक्क्यांनी वाढला होता तर करोत्तर नफा (Profit After Tax) ११२.०१ टक्क्यांनी वाढला होता.कंपनीचे एकूण बाजार भांडवल २४९४७.९ कोटी रुपये आहे.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर व्यवसायामधील कामकाजासाठी, व व्यवसायाच्या संबंधित इतर खर्चासाठी करण्यात येणार आहे.