भारतीय स्मार्टफोन शिपमेंटमध्ये दणक्यात वाढ - अहवाल

मार्चमध्ये शिपमेंटमध्ये ८ ते १० टक्क्यांनी वाढ

    10-May-2024
Total Views |

Smartphone
 
 
 
मुंबई: भारताच्या स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ झाली आहे. स्मार्टफोन शिपमेंटमध्ये ८ ते १० टक्क्यांनी वाढ मार्च २०२४ मध्ये झाली आहे. काऊंटरपार्ट रिसर्च (Counterpart Research) या अहवालातील माहितीप्रमाणे, व्यापार व संख्या (Volume) मध्ये'सॅमसंग' ने प्रथम क्रमांक पटकावला आहे क्रमांक दोनवर ॲपल कंपनीने पटकावला आहे. या दोन कंपन्यांचे मार्केट शेअर अनुक्रमे २३ व १९ टक्के असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.
 
याशिवाय अजून एक अहवाल सायबरमिडिया रिसर्च (CyberMedia Research) या अहवालातील माहितीप्रमाणे, भारतीय स्मार्टफोन बाजार इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १० टक्क्यांनी वाढले आहे. या रिसर्च मधील माहितीनुसार, वोल्युममध्ये ८ टक्क्यांनी व किंमतीच्या मूल्यांकनात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दोन्ही अहवालाच्या मते 'सॅमसंग' हा भारतीय स्मार्टफोन बाजारातील ' लीडर ' ठरला आहे.
 
सीएमआर अहवालातील अनुमानाने, इयर ऑन इयर बेसिसवर सॅमसंग फोनच्या शिपमेंटमध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सेगमेंटमधील वोल्युममध्ये १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे एकूण बाजाराच्या ५ जी स्मार्टफोन बाजारात २२ टक्के वाटा सॅमसंग कंपनीचा असून त्यानंतर विवो (१८ टक्के) आहे. एकूण मोबाईलच्या उलाढालीत इयर ऑन इयर बेसिसवर २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२४ मध्ये पहिल्या तिमाहीत सर्वाधिक मार्केट शेअर संख्या सॅमसंग (१८.८ टक्के) असून त्यानंतर शाओमी (१८.६%) विवो (१६ टक्के) आहे. यानंतर ओपो (१० टक्के) व रियलमी (१० टक्के) या कंपन्यांचा क्रमांक लागतो.
 
काउंटरपॉईंट रिसर्चनुसार,सॅमसंग वोल्युममध्ये २५ टक्क्यांनी क्रमांक एकचा ठरत दुसरा क्रमांक ॲपल (१९ टक्के) ठरला आहे. "एक चतुर्थांश शेअरसह, सॅमसंगने मूल्याच्या बाबतीत बाजाराचे नेतृत्व केले. तसेच, युएसडी ४२५ वर, सॅमसंगचा ASP (सरासरी विक्री किंमत) हा आतापर्यंतचा सर्वोच्च होता, जो २०००० रुपयांपेक्षा जास्त विभागातील त्याच्या अग्रगण्य स्थानामुळे चालतो. हे असू शकते. सॅमसंगच्या वित्तपुरवठा योजनांच्या वाढत्या लोकप्रियतेसह त्याच्या GenAI सारख्या वैशिष्ट्यांमुळे आणि नव्याने सुधारित केलेल्या A मालिकेमुळे त्याच्या नव्याने लाँच झालेल्या Galaxy S24 मालिकेच्या मजबूत मिश्रणाचे श्रेय आहे," काउंटरपॉईंट अहवालात म्हटले आहे.
 
ॲपलने भारतात विक्रमी तिमाही देखील पाहिली, जी मूल्य आणि व्हॉल्यूम या दोन्ही बाबतीत प्रीमियम सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे, नवीनतम iPhone १५ मालिकेद्वारे, विशेषतः ऑफलाइन चॅनेलमध्ये, अहवालात जोडले गेले.
या अहवालाविषयी बोलताना, सीएमआर एनालिस्ट भास्कर नेगी म्हणाले, ' २०२४ मध्ये आणि त्यापुढील काळात स्मार्टफोनची बाजारपेठ 5G सेगमेंटच्या मूल्य-मूल्यासाठी तीव्र स्पर्धेसाठी तयार आहे. "या ट्रेंडचा फायदा घेणारे ब्रँड - परवडणारे 5G, शक्तिशाली ऑन-डिव्हाइस AI आणि अखंड क्रॉस-डिव्हाइस अनुभव - या वाढत्या पण अति स्पर्धात्मक बाजारपेठेत जिंकण्यासाठी योग्य स्थितीत असतील,'
 
काउंटरपॉईंट रिसर्चच्या वरिष्ठ संशोधन विश्लेषक शिल्पी जैन यांनी सांगितले की, "तिमाही दरम्यान, भारताच्या स्मार्टफोन बाजाराने Q1 मूल्याचे आतापर्यंतचे उच्चांक गाठले. प्रीमियमच्या बळकटीकरणाच्या प्रवृत्तीमुळे ग्राहकांनी किमतीच्या स्तरांवर उच्च-मूल्याच्या स्मार्टफोनमध्ये सुधारणा केल्याने ही वाढ झाली.' असे म्हटले आहे.