एअर इंडियाची सेवा पूर्ववत कर्मचाऱ्यांचे निलंबन ' या ' अटीवर मागे

तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र तातडीने देत पुन्हा कामावर बडतर्फ कर्मचारी रूजू होणार

    10-May-2024
Total Views |

Air India
 
 
मुंबई: एअर इंडियाच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा सुधारणा झाली आहे. कर्मचारी परतल्याने आता सेवा पूर्ववत झाली आहे.एअर इंडियाच्या काही कर्मचाऱ्यांनी सामूहिक 'सिक लिव्ह' (आजारी सुट्टी) घेतल्याने एअर इंडियाच्या व्यवस्थापनात गैरसोय होऊन अनेक विमाने रद्द झाली होती. ज्यामुळे प्रवाशांना गैरसोय होऊन १७० विमान रद्द करण्याच्या नाईलाजाने निर्णय एअर इंडियाला घ्यावा लागला होता.
 
यानंतर दंडात्मक कारवाई करत एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने २५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते. मात्र युनियन व व्यवस्थापन यांच्या समझोता झाल्याने पुन्हा 'फिट' असल्याचे प्रमाणपत्र तातडीने मागत त्यांना कामावर रूजू होण्यास सांगितले होते.आता कर्मचारी पुन्हा कामावर परतल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कंपनीने काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. एअर इंडिया दररोज ३९० विमानांची सेवा पुरवते यामधील १७१ विमाने रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल होण्याबरोबरच विमान वाहतूक यंत्रणेवर ताण पडला होता.
 
शुक्रवारपासून आंतरराष्ट्रीय विमानप्रवास पूर्ववत होण्याची चिन्हे असल्याने आता कुठलीही गैरसर होणार नाही याची काळजी कंपनीने घेतली आहे.अनेक केबिन क्रू सदस्यांनी एअरलाइनमधील कथित गैरव्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत समानता नसल्याचा निषेध करण्यासाठी आजारी असल्याची तक्रार नोंदवली होती.
 
एअर इंडिया एक्सप्रेस - जी AIX Connect चे विलीनीकरण पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे, पूर्वी AirAsia India, स्वतःमध्ये २००० पेक्षा जास्त केबिन क्रूसह सुमारे ६००० कर्मचारी आहेत.