तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर देशाच्या विदेशी मुद्रेत मोठी वाढ

विदेशी मुद्रा ३.७ अब्ज डॉलर पातळीवर

    10-May-2024
Total Views |

forex
 
 
मुंबई: चार आठवड्यानंतर भारताच्या विदेशी मुद्रेत मोठी वाढ झाली आहे. वित्तीय समितीने डॉलरच्या खरेदीत वाढ केल्याने भारतीय परकीय चलन साठ्यात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेने ३ मे पर्यंत घोषित केलेल्या आकडेवारीनुसार, भारताची विदेशी मुद्रेचा साठा वाढला आहे. हा साठा ३.७ अब्ज डॉलरने वाढल्याने एकूण साठा ६४१.५९ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात हा साठा मोठ्या प्रमाणात वाढला होता. मात्र त्यानंतर विदेशी मुद्रेत घसरण झाली होती.
 
एप्रिल महिन्यात विदेशी मुद्रा साठा ६४९ डॉलर्सपर्यंत वाढ झाली होती. त्यानंतर सलग तीनवेळा ही घट झाली होती. मात्र रुपयांची घसरण व रुपयांच्या मूल्यांकनात वाढलेल्या मोठा चढ उतार कमी करण्यासाठी आरबीआयने उपाययोजना केली होती. युएस डॉलरच्या किंमतीत वाढ होत असताना भारतीय रुपया तीन आठवड्यापूर्वी घसरला होता याशिवाय आशियाई चलनातील येन चलनात देखील घसरण झाली होती. तेव्हा रुपया ८३.५७ या नव्या निचांक पातळीवर आला होता.
 
यानंतर भारताच्या चलनाच्या व्यवस्थापन संस्थेने रणनीती आखत रुपयांची पडझड कमी केली त्यातच जेपी मॉर्गन चेस अँड को कंपनीचा हिस्सा भारतीय चलन बाँड होणार आहे. जूनमध्ये यांची सुरूवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणात विदेशी मुद्रा भारतीय तिजोरीत वाढण्याची शक्यता आहे.
 
याशिवाय आरबीआय आपले चलन वाढवण्याला प्राधान्य देतानाच प्रथम देणी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे ज्यामध्ये विदेशी चलन वाढवण्यावर भर देताना रुपयांचे मूल्यांकन राखण्यास आरबीआयला मदत होणार आहे.