अफवांपासून सतर्क राहण्याचा खलाशांना सल्ला

जहाजबांधणी महासंचालनालयाने जारी केले पत्रक

    10-May-2024
Total Views |

cruize


मुंबई, दि.९ :  
सीमाशुल्क, राज्य पोलीस विभाग, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय), इमिग्रेशन यांसारख्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्राधिकरणांकडून अधिकारी आणि सरकार मंत्रालयातील अधिकारी असल्याचा दावा केला करत नाविक, खलाशी किंवा कुटुंबातील सदस्यांकडून फसव्या बहाण्याने पैसे मागण्याच्या काही घटना निदर्शनात आल्याने पत्तन, पोत आणि जलमार्ग मंत्रालय, केंद्र सरकार आणि नौवहन संचानालय, मुंबई यांनी एक ऍडव्हायजरी जारी केली आहे. ज्याद्वारे अशा फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी खलाशी आणि त्यांच्या कुटुंबियांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

जहाजबांधणी महासंचालनालयने जारी केलेल्या या सल्ला पत्रकात म्हंटले आहे की, फसवणूक आणि अफवांद्वारे पैसे उकलण्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. अनेक प्रकरणांत अज्ञात व्यक्तींनी दूरध्वनी, व्हॉट्सॲप संदेश आणि ईमेल इत्यादीद्वारे नाविकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि आरोप केला की, जहाजांवर काम करणारे त्यांचे नाविक तस्करी, अंमली पदार्थ,चोरी, बलात्कार आणि खून यासारख्या गंभीर बेकायदेशीर प्रकरणांमध्ये फसले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी किंवा मदतीसाठी पैशांची मागणी केली आहे. हे दावे सामान्यतः खोटे आणि संशयास्पद असतात. कुटुंब सदस्यांना फसवण्यासाठी आणि त्यांचे शोषण करण्यासाठी तयार केलेले असतात, अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

तसेच, जहाजबांधणी महासंचालनालय सर्व नाविकांना कुटुंबातील सदस्यांना असे कॉल किंवा ईमेल प्राप्त करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहे. अशा कॉल, संदेश किंवा ईमेल पाठवणाऱ्याची अचूक माहिती तपासा आणि योग्य पडताळणी शिवाय अज्ञात व्यक्तींना पैसे हस्तांतरित करू नका. तसेच, असे कॉल किंवा ईमेल प्राप्त झाल्यास खलाशांच्या कुटुंबातील सदस्यांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही बाब तात्काळ रिक्रूटमेंट अँड प्लेसमेंट सर्व्हिसेस (आरपीएस) एजन्सीच्या संबंधित नोडल अधिकाऱ्याला किंवा जहाज मालकांच्या प्रतिनिधींना कळवावी. जहाजावरील कंत्राटी खलाशी, नाविक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सुरक्षा, सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सतर्क करून संबंधित प्रकरण त्वरित हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहितीही या ऍडव्हायजरीमध्ये देण्यात आली आहे.