सांगलीच्या जागेबाबत षडयंत्र! विश्वजित कदमांचा मोठा गौप्यस्फोट

01 May 2024 18:12:50

Vishwajit Kadam 
 
सांगली : सांगली लोकसभेच्या जागेबाबत नक्की काहीतरी षडयंत्र झालेलं आहे, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी केला आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उबाठा गटात वाद रंगला होता. बुधवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना विश्वजित कदमांनी याबाबत खुलासा केला आहे.
 
विश्वजित कदम म्हणाले की, "सांगलीच्या जागेबाबत कुठेतरी काहीतरी शिजलं आहे. काय शिजलं, कसं शिजलं, कुणी शिजवलं हे सत्य येणाऱ्या काळात उघडकीस येईल. सांगलीची जागा जात नव्हती हे एक नक्की. परंतू, काहीतरी षडयंत्र झालेलं आहे. राज्याच्या राजकारणात मला आणि जिल्ह्याच्या राजकारणात विशाल पाटील यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला. सांगलीच्या जागेबाबत भविष्यात कुणी हक्क सांगण्याचा प्रश्नच येत नाही. हे जे काही घडलं ते अपवादात्मक घडलेलं आहे," असे ते म्हणाले. तसेच विशाल पाटलांच्या कारवाईबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  महाराष्ट्रातील ४८ जागांवर प्रचार करणार : किरीट सोमय्या
 
काँग्रेस नेते विशाल पाटील हे सांगलीतून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. परंतू, सांगली लोकसभेसाठी उबाठा गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, विशाल पाटील आणि विश्वजित कदमांचा याला विरोध होता. त्यामुळे विशाल पाटीला आता अपक्ष निवडणूक लढणार आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0