व्यवसायिक गॅसच्या किंमतीत कपात मुंबईत १९ रुपयांनी गॅस स्वस्त!

01 May 2024 14:28:28

gas
 
 
मुंबई: जागतिक पातळीवरील क्रूड तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे आज सरकारने व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. १ मे पासून हे नवे दर लागू होणार आहेत.
 
मुंबईत सिलेंडरचा किंमतीत १९ रुपयांनी घट केली आहे. दिल्लीत गॅसची किंमत १७४५ रुपये झाली आहे. मुंबईत सिलेंडरचा किंमतीत १९ रुपयाने कपात झाल्याने नवी किंमत १६९८.५० रुपये असणार आहे. चेन्नईतील किंमत १९११ रुपये व कलकत्ता शहरात गॅसची किंमत १८५९ रुपये झाली आहे. चेन्नईतील गॅसच्या किंमतीत १९ रुपये व कलकत्ता येथे गॅसच्या किंमतीत २० रुपयांनी कपात झाली आहे.
 
युएस क्रूड तेलाच्या निर्देशांकात घट झाल्याने आशियाई बाजारातील क्रूड तेलाच्या किंमती स्वस्त झाल्याने भारत सरकारने व्यवसायिक गॅस सिलेंडरचे दर कपात केले आहेत.
 
Powered By Sangraha 9.0