बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्रातील शेकडो तरुणांना रोजगार

प्रकल्पबाधित तरुणांना देण्यात येतेय प्रशिक्षण

Total Views | 71


NHSRCL


मुंबई, दि.१: 
भारतातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील शेकडो तरुण तांत्रिक प्रशिक्षण घेऊन रोजगारक्षम झाले असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. महाराष्ट्रातील १३२ प्रकल्पबाधित तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले असून हे तरुण आज प्रकल्प स्थळांवर कार्यरत आहेत.

एनएचएसआरसीएलने दिलेल्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२४पर्यंत ५०६ प्रकल्पबाधित तरुणांनी विविध तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण घेतले. त्यापैकी ३७४ तरुण हे गुजरातमध्ये तर महाराष्ट्रातील १३२ तरुणांनी सहभाग नोंदविला आहे. सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यातील १९ तरुणांना सहाय्यक इलेक्ट्रिशियनचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. एनएचएसआरसीएल आणि रुस्तमजी ॲकॅडमी फॉर ग्लोबल करिअर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने पालघरमधील प्रकल्पग्रस्त गावांतील तरुणांना हे तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आहे. ४ एप्रिलपासून सुरु झालेल्या या प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील १९ युवकांना लाभ होणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) शी देखील संलग्न आहे.

नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून भारतात पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प साकारण्यात येतो आहे. महाराष्ट्रातील पालघर, वसई-विरार, ठाणे, बोईसर याठिकाणी प्रकल्पांच्या कामांना वेग आहे. तत्पूर्वी, या प्रकल्पासाठी दोन्ही राज्यातील जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. या प्रकल्पासाठी १०० टक्के भूमीअधिग्रहण पूर्ण झाले आहे. इतकेच नाहीतर प्रकल्पबाधित तरुणांनाही रोजगार देण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आले. बांधकामाच्या टप्प्यातच या प्रकल्पातून सुमारे ८०,००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

प्रशिक्षित तरुण करणार ही कामे.

- इंस्टॉलेशन, दुरुस्ती आणि देखभाल
- विविध इलेक्ट्रिकल कामांमध्ये इलेक्ट्रिशियन्सना मदत
- बांधकाम साइट्सवर तात्पुरते कमी-व्होल्टेज विद्युत कनेक्शन उभारणे
- बांधकाम प्रकल्पांशी संबंधित हँड टूल्स, पॉवर टूल्स आणि इलेक्ट्रिकल उपकरणांचा कौशल्यपूर्ण वापर
- बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरते लो-व्होल्टेज इलेक्ट्रिकल पॅनेल (वितरण बोर्ड) लावणे आणि संचलन
- निवासी आणि व्यावसायिक इमारतींमध्ये कायमस्वरूपी विद्युत कनेक्शन स्थापित करणे

प्रशिक्षण कार्यक्रम

- महिलांसाठी शिलाई आणि टेलरिंग प्रशिक्षण
- टू व्हीलर मेकॅनिक प्रशिक्षण
- संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग प्रोग्रॅम
- डिजिटल मार्केटिंग
- महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण
- प्रकल्पस्थळांवर आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121