"भाजपला मत देणे चांगले'; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा व्हिडिओ व्हायरल

01 May 2024 17:26:44
 d
 
कोलकाता : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि संसदेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी ( Adhir Ranjan Choudhry ) यांनी एका रॅलीमध्ये बिजेपी ला वोट करण्याची अपिल केली. पश्चिम बंगालच्या बेहरामपुर येथील एका रॅलीमध्ये टिएमसीला मत देण्याऐवजी भाजपला मत द्यावं असं म्हटलं आहे. हे बोलतानाचा त्यांचा विडीयो सोशल मिडीयावर वायरल होत आहे.
 
अधीर रंजन चौधरी बेहरामपुर लोकसभा मतदारसंघातुन सलग पाच वेळा खासदार म्हणुन निवडणुन आले आहेत. ते टिएमसीच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कडवे विरोधक राहीले आहेत. ते पुन्हा या मतदारसंघातुन निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार आहेत. आपल्या प्रचार रॅलीमध्ये बोलताना त्यांनी असे वक्तव्य केले. ते बंगालीमध्ये म्हणाले "टीएमसीला मत का द्यावे, भाजपला मत देणे चांगले आहे," अधीर रंजन चौधरी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
हे वाचलत का ?- "वारंवार बडबड करणाऱ्यांची जागा कुठे असते हे सांगण्याची गरज नाही!"
 
यावरुन इंडी आघाडीतील तणाव मात्र समोर आला आहे. काँग्रेसप्रणित इंडी गठबंधन जरी त्यांच्यामध्ये एकता असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात मात्र इंडी मधील पक्षांचे वैर बाहेर येत आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबत २ जागांच्या वादावरुन तुटली आणि आता ममता बॅनर्जी सर्व ४२ जागांवर निवडणुक लढत आहेत.
 
 
पश्चिम बंगालचा सत्ताधारी पक्ष टीएमसी पूर्वी इंडी आघाडीत सामील होती, परंतु लोकसभा निवडणुकीच्या जागांच्या वाटपात त्यांनी इंडी आघाडी सोडली. दोन्ही पक्ष एकमेकांना भाजपचे मित्रपक्ष म्हणतात. टीएमसीने माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात मैदानात उतरवले आहे. अधीर रंजन चौधरी हे बहारमपूर लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा खासदार आहेत, पण यावेळी त्यांचा मार्ग अवघड दिसत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0