सलमान खान गोळीबार प्रकरणातील एका आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या

01 May 2024 18:26:41
salman khan
 
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी एक महत्वाची घडामोड समोर आली आहे. गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शस्त्रे पुरवणाऱ्या एका आरोपीने बुधवार दिनांक १ मे रोजी पोलिस कोठडीत आत्महत्या केली आहे. मृत आरोपी अनुज थापन याला पंजाबमधून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस मुख्यालयात आरोपी अनुज थापन याला ठेवण्यात आले होते. तेथील बाथरुममध्ये जात बेडशिटने गळफास लावून त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, आरोपीने आत्महत्या केल्याचे समजताच तात्काळ त्याला जी.टी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
 
अभिनेता सलमान खानच्या घरावर १४ एप्रिल २०२३ रोजी गोळीबार झाला होता. गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी शस्त्रे पुरवणाऱ्या आरोपी अनुज थापरने आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर त्याला जीटी रुग्णालयात नेण्यात आलं होतं, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं आहे. दरम्यान, आरोपी अनुज थापन हा बिष्णोई टोळीशी संबंधीत असून त्याच्याविरोधात खंडणी, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे देखील दाखल आहेत.
Powered By Sangraha 9.0