मुंबई : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने विविध कलांची जवळून ओळख करून घेण्यासाठी आणि आपलं जगणं अधिक समृद्ध करण्यासाठी अभिरुची जोपासना कार्यशाळेचे आयोजन केले आहे. दिनांक 11 मे तसेच दिनांक 12 मे रोजी ज्ञान नैपुण्य केंद्र केशव सृष्टी एस्सेल्वर्ल्ड रोड उत्तन येथे आयोजित केली आहे. कलांची आवड असणारे कोणीही साधा माणूस ते कलासक्त रसिक हा चैतन्यमय प्रवास अनुभवण्यासाठी या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतो. यात अभिरुची संपन्नता कशासाठी, मैत्री पुस्तकांची, शास्त्रीय संगीताचा कान तयार करणे, सुगम आणि चित्रपट संगीत, अनुभव आणि आनंद, चित्रपट पाहण्याची दृष्टी, नाटक समजून घेताना, रसिक नजरेतून चित्रकला, शिल्पकला आणि निर्जीवातील जिवंतपणा अशा एकूण आठ विषयांवर अनुभव संपन्न मार्गदर्शक सत्र घेणार आहेत. यावेळी निवास भोजन आणि प्रशिक्षण साहित्यसह सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येतील या संपूर्ण कार्यशाळेचे शुल्क जीएसटी सहित केवळ तीन हजार रुपये इतके आहे नोंदणीसाठी विनय माळवणकर अनिल पांचाळ साक्षी मोरे यांना अनुक्रमे ९०९६५४८२५०, 9975415922, 9967844184 या क्रमांकावर संपर्क करा.