मुख्य निवडणूक आयुक्तांना 'झेड' सुरक्षा; आयबीचा सरकारला अहवाल!

09 Apr 2024 14:53:05
chief election commissioner


नवी दिल्ली :       देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. राजीव कुमार यांच्या सुरक्षेला धोका असल्याचे गुप्तचर संस्थेने सांगतिले आहे. त्यानंतर आता गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार केंद्र सरकारकडून राजीव कुमार यांना 'झेड' सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)च्या अहवालाच्या आधारावर, केंद्रीय गृह मंत्रालयाने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. राजीव कुमार यांना 'झेड' श्रेणीची सुरक्षा मिळाल्यानंतर आता ते देशात कोठेही जातील, तिथे त्यांना सुरक्षा देण्यात येणार आहे.
वास्तविक, देशात लोकसभा निवडणुकीचे पडसाद उमटत आहेत. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सोबतच अनेक राजकीय पक्ष यावेळी गोंधळ घालत आहेत. हे लक्षात घेता इंटेलिजन्स ब्युरोने 'थ्रेट परसेप्शन रिपोर्ट' जारी केला आहे. या अहवालाच्या आधारे मुख्य निवडणूक आयुक्तांना सुरक्षा देण्यात आली आहे.

दरम्यान, 'झेड' सुरक्षेत ४ ते ६ एनएसजी कमांडो आणि पोलिसांसह २२ जवानांचा समावेश आहे. उद्योगपती गौतम अदानी, बाबा रामदेव आणि अभिनेता आमिर खान यांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. एखाद्या खाजगी व्यक्तीला झेड श्रेणी अंतर्गत सुरक्षा कवच मिळाल्यास, तो त्यासाठी पैसे देतो तर इतर व्यक्तींसाठी सरकार खर्च करते.




Powered By Sangraha 9.0