खुशखबर! 'सूर्य तिलक' लावण्यात वैज्ञानिकांना आले यश
09 Apr 2024 18:10:24
मुंबई (प्रतिनिधी) : अयोध्येत मोठ्या उत्साहात होणाऱ्या रामनवमीला श्री रामललांच्या कपाळावरील 'सूर्य तिलक' (Surya Tilak) खास आकर्षण असणार आहे. ऑप्टोमेकॅनिकल प्रणालीसाठी विशिष्ट उपकरणे लावली असून वैज्ञानिकांना 'सूर्य तिलक' आणण्यात यश आले आहे. श्री रामलला मंदिराचे दर्शन प्रभारी गोपालजी यांनी याविषयी माहिती दिली.
सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकी, उत्तराखंडच्या वैज्ञानिकांची टीम या कामात गेले काही दिवस व्यस्त होती. प्रभू श्रीरामललाच्या कपाळाचे अचूक स्थान सुनिश्चित करण्यासाठी एक स्टिकर लावण्यात आले होते. वैज्ञानिकांनी केलेल्या चाचणीदरम्यान प्रभू श्री रामलल्लाच्या कपाळी चार मिनिटे सूर्य तिलक आणण्याच्या प्रयत्नांना यश आले असून रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजताही सर्वांना ते पाहता येईल, असा विश्वास गोपालजीनी व्यक्त केला आहे.