‘संगीत मानापमान’ चे पहिले पोस्टर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित

09 Apr 2024 11:58:04
येत्या दिवाळीत सजणार, मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार, सुरेल गीतांचा आवाज
 

subodh  
 
मुंबई : अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) दिग्दर्शित आणि अभिनित ‘संगीत मानापमान’ या चित्रपटाचे पहिले पोस्ट गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये सुबोध भावे (Subodh Bhave) एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहेत. शिवाय त्याच्या पेहरावामुळे या चित्रपटाची भव्यता झळकून येत आहे.
 
या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून, ‘कट्यार काळजात घुसली‘ तसंच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर‘ या चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे. आणि त्याचबरोबर मुख्य म्हणजे प्रसिध्द संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.
 

subodh  
 
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या अजरामर कलाकृतीवरून प्रेरित, 'संगीत मानापमान' हा संगीतमय चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शनास सज्ज होणार आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0