गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात यशाची गुढी सेन्सेक्स निफ्टीत चांगली वाढ

09 Apr 2024 11:27:05

Stock Market
 
 
मुंबई: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बाजाराने नवे उच्चांक गाठले आहेत. निफ्टी ५० निर्देशांकात सकाळी ११ वाजता ८३.९५ अंशाने व सेन्सेक्स ३३९.८७ अंशाने वाढ होत बाजारात आजही रॅली झाली आहे. बीएससीत आज सेन्सेक्स निर्देशांकात आज ३४५.८४ अंशाने वाढ झाली असून निफ्टी बँक निर्देशांकात २९१.६० अंशाने वाढ झाली आहे.
 
आज जागतिक पातळीवर क्रूड तेलाच्या भावात स्थिरता आल्याने आज आशियाई बाजारात तेलाचे दर स्थिरावले आहेत. काल युएस बाजारात शेअर बाजार किंचीत वरच्या पातळीवर स्थिरावले होते. युएस महागाई दर व रेपो व्याजदर कपातीची अपेक्षा यामुळे बाजारात मोठी चढ उतार पहायला मिळाली होती. तर भारतीय बाजारात गुंतवणूकदारांना वाढलेला विश्वास आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतात वाढलेली गुंतवणूक यामुळे काल भारतीय शेअर बाजार सकारात्मक आजही कायम दिसले आहे.
 
बीएससीत टाटा स्टील, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एचसीएलटेक, जेएसडब्लू स्टील, एक्सिस बँक,टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट,विप्रो, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, नेसले या समभागात गुंतवणूकदारांना सकाळच्या सत्रात फायदा झाला आहे. तर एनटीपीसी, रिलायन्स, एशियन पेंटस, कोटक महिंद्रा, एम अँड एम, मारूती सुझुकी,इंडसइंड बँक, एचयुएल, भारती एअरटेल, सनफार्मा या समभागात नुकसान झाले.
 
एनएससीतील टाटा स्टील, हिंदाल्को, आयसीआयसीआय बँक,अपोलो हॉस्पिटल, जेएसडब्लू स्टील, ग्रासीम, एचसीएलटेक, टीसीएस, एक्सिस बँक,अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, अदानी पोर्टस, बजाज फायनान्स, नेसले इंडिया,एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स या समभागात गुंतवणूकदारांना फायदा झाला असून कोल इंडिया, आयशर मोटर्स, बीपीसीएल, टाटा कनज्यूमर, एनटीपीसी, टायटन, अदानी एंटरप्राईज, ब्रिटानिया,कोटक बँक, मारूती सुझुकी, डिवीज, श्रीराम फायनान्स,सिप्ला,सनफार्मा या समभागात आज नुकसान झाले आहे. आज निफ्टी निर्देशांकात सर्वाधिक वाढ मेटल, रियल्टी, आयटी समभागात झाले आहे.
 
Powered By Sangraha 9.0