रितेश-जिनिलियाने मुलांसह दिल्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा; म्हणाली, “पहाटे आमची…”

    09-Apr-2024
Total Views |
जिनिलीया देशमुखने व्हिडिओ शेअर करत अनोख्या अंदाजात दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
 

deshmukh  
 
मुंबई : आज हिंदु नवं वर्ष अर्थात गुढी पाडवा. घरोघरी गुढ्या उभारुन लोकं नवीन वर्षाचं स्वागत करतात. अभिनेता रितेश देशमुख आणि वहिनी जिनिलिया देशमुख यांनी कुटुंबांसह सगळ्यांना गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) आणि नवं वर्षांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशमुख कुटुंब गुढीला (Gudhi Padwa) सजवत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
 
जिनिलीया देशमुखने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात रितेश देशमुख आपल्या मुलांबरोबर रिआन व राहिलासह गुढी सजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जिनिलीयाने लिहिलं आहे, “पहाटे आमची गुढी तयार होतं आहे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.”
 

deshmukh  
 
दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झाल्यास रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा जिनिलीया सांभाळणार आहे.