आज हिंदु नवं वर्ष. घरोघरी सामान्य माणसांसह मराठी कलाकारांनी देखील गुढी उभारुन पाडव्याच्या (Gudhi Padwa) आणि नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहूयात मराठी कलाकारांनी कसा साजरा केला गुढी पाडवा.
दिग्दर्शक रवी जाधव यांनी पत्नी मेघना जाधव सोबत घरी उभारली गुढी.
प्रसाद आणि मंजिरी ओक यांनी नवं वर्षांचं केलं स्वागत.
अभिनेत्री पुजा सावंत हिने नवऱ्यासह साजरा केला पहिला गुढी पाडवा.
अभिनेता अंकुश चौधरी याने पत्नी अभिनेत्री दीपा परब-चौधरी आणि मुलासह हिंदु नवं वर्षाचं गुढी उभारुन केलं स्वागत.
अभिनेता श्रेयस तळपदे याने पत्नी आणि मुलीसह उभारली गुढी.