भारतातील रोबस्टा कॉफीची जानेवारी ते मार्चमध्ये निर्यात १३.३५ टक्क्यांनी वाढली

09 Apr 2024 14:55:36

Coffee
 
मुंबई: जानेवारी ते मार्च कालावधीत कॉफीची निर्यात १३.३५ टक्क्यांनी वाढत १२५६३१ टनाने वाढली आहे. अधिकृत माहितीनुसार रोबस्टा कॉफीची वाढलेली मागणी लक्षात घेता निर्यातीत वाढ झाली आहे.देशाने एकूण ११०८३० टन कॉफीची निर्यात मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या जानेवारी ते मार्च तिमाहीत केली होती.आशियातील क्रमांक तिसरी मोठी कॉफी उत्पादक म्हणून रोबस्टा (Robusta) कॉफी ओळखली जाते. याशिवाय मोठ्या उत्पादनात अरेबिका (Arabica) कॉफीचा नंबर देखील लागतो.
 
अरेबिका प्रकारच्या कॉफीत कँफेन (Caffeine) चे प्रमाण कमी असते. रोबस्टा कॉफीत ते अरेबिकापेक्षा तुलनेने जास्त असते. अरेबिका कॉफीची चव गोड असून रोबस्टा कॉफीची चव थोडी कडवट असते.
 
कॉफी बोर्ड ऑफ इंडियाने दिलेल्या नव्या माहितीनुसार,रोबस्टा कॉफीची निर्यात आर्थिक वर्ष २०२४ मधील पहिल्या तिमाहीत १८ टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षाच्या या तिमाहीतील तुलनेत ही वाढ ५९०५० टनने वाढली आहे. अरेबिका कॉफीची निर्यात मात्र १५४६८ वरून घटत १३४१९ टनांपर्यंत पोहोचली आहे.
 
दुसरीकडे तत्काळ कॉफीची (Instant Coffee) ची जानेवारी ते मार्च तिमाहीत निर्यात १६२१८ टनानी वाढली आहे. मागील वर्षी आर्थिक तिमाहीत ही वाढ १५२३८ टनांपर्यंत होती. याशिवाय कॉफीची पुननिर्यात मागील वर्षाच्या तिमाहीतील २०९५२ टनाहून वाढत २६२३९ टनांपर्यंत पोहोचली आहे. इटली, रशिया, जर्मनी, टर्की हे भारतात कॉफीची निर्यात करतात. संपूर्ण आर्थिक वर्षात कॉफीची निर्यात ५.४ टक्क्यांनी घसरत ३.७७ लाख टनांपर्यंत पोहोचली आहे.
 
Powered By Sangraha 9.0