भारताचा अपमान करणाऱ्या पोस्टनंतर मंत्र्याकडून जाहीर माफी!
08-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली : मालदीव सरकारमधील मंत्री मरियम शिउना यांनी भारतीय ध्वजाचा अपमान करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. त्यावर भारतीयांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आता मंत्री शिउना यांच्याकडून माफी मागण्यात आली आहे. दरम्यान, शियुना यांनी याआधी विरोधी पक्ष मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीवर निशाणा साधला होता. तसेच भारतीय ध्वजाचा अपमानही केला.
मालदीवच्या मंत्री मरियम यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहिले होते, “मला माझ्या अलीकडील सोशल मीडिया पोस्टपैकी एकाबद्दल बोलायचे आहे ज्यामुळे खूप गोंधळ आणि टीका झाली आहे. माझ्या पोस्टमुळे झालेल्या गोंधळाबद्दल किंवा दुखावल्याबद्दल मी दिलगीर आहोत. माझ्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की विरोधी पक्षाच्या उत्तरात वापरलेला फोटो भारतीय ध्वजाच्या तिरंग्यासारखा आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की हे जाणूनबुजून केले गेले नाही आणि मला खेद वाटतो, असे त्यांनी पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
सदर प्रकाराबाबत मालदीव सराकारमधील मंत्र्यांनी माफी मागितली आहे. मंत्र्यांनी दि. ०६ एप्रिल रोजी रात्री तिच्या पीपीएम पक्षाला पाठिंबा मिळवून देणारी पोस्ट केली होती. यामध्ये अशोक चक्रासह विरोधी पक्ष पीपीएमला लक्ष्य करत पोस्टर बनवण्यात आले होते आणि त्यावर लिहिले होते की, “एमडीपी त्यांच्या (भारताच्या) जाळ्यात पडत आहे, आम्हाला (मालदीवला) पुन्हा त्यांच्या जाळ्यात पडण्याची गरज नाही.”, अशा आशयाची पोस्ट करण्यात आली होती.
मंत्र्यांनी केलेल्या पोस्टमध्ये बनावट पोस्टरमधून केवळ अशोक चक्रच नाही, तर भाजपचे निवडणूक चिन्ह कमळही होते. हे निवडणूक चिन्ह मालदिवियन डेमोक्रॅटिक पार्टीकडून निवडणुकीत चिन्ह वापरले गेले. या माध्यमातून उभय पक्षांकडून युतीचे संकेत दिले होते. उल्लेखनीय आहे की, मालदिवियन डेमोक्रॅटिक पार्टी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या भारतविरोधी धोरणांना विरोध करत आहे.