नवी दिल्ली : गुजरात विद्यापीठात बेकायदेशीरपणे वसतिगृहात राहणाऱ्या ७ अफगाणी विद्यार्थ्यांना विद्यापीठास सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, अफगाणी विद्यार्थ्यांकडून कोणत्या ना कोणत्या कारणावरून वसतिगृहाचा वापर करण्यात येत आहे. परंतु, आता सदर प्रकार विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात येताच विद्यार्थ्यांना वसतिगृह रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे.
गुजरात विद्यापीठ येथे नमाज पठणावरून वाददेखील झाला आहे. भारतीय विद्यार्थी आणि अफगाणी विद्यार्थ्यांमध्ये नमाज पठणावरून जोरदार वाद निर्माण झाला. या वादानंतर सर्व परदेशी विद्यार्थ्यांना दुसऱ्या वसतिगृहात हलविण्यात आले आहे. आता एनआरआय वसतिगृहातील नमाज वादानंतर गुजरात विद्यापीठाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्यापीठाने ७ अफगाण विद्यार्थ्यांना बाहेर काढले असून हे विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहात बेकायदेशीरपणे राहत होते. शिक्षण पूर्ण करूनही तो कोणत्या ना कोणत्या बहाण्याने वसतिगृहात राहत होते. गुजरात विद्यापीठाने माजी विद्यार्थ्यांना नोटीस बजावली असून त्यापैकी ५ विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडले आहे.