नवी दिल्ली : काँग्रेसने भारताच्या नव्हे तर पाकिस्तानच्या निवडणुकीसाठी जाहीरनामा बनविला आहे, असा खोचक टोला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस पक्षाला लगावला आहे. ते पुढे म्हणाले, "हा तुष्टीकरणाचा जाहीरनामा असून भारतातील नव्हे, तर पाकिस्तानातील निवडणुकांसाठी आहे असे वाटते, काँग्रेसची मानसिकता समाजात फूट पाडून सत्तेत येण्याची आहे, असेही मुख्यमंत्री सरमा यावेळी म्हणाले.
दरम्यान, तिहेरी तलाक, बालविवाह व एकाच व्यक्तीने २-३ वेळा लग्न करावे असे कुणालाच वाटत नाही मग तो हिंदू असो वा मुस्लिम, ही विचारसरणी काँग्रेसवाले लोकच आणतात. कारण त्यांना समाजात फूट पाडायची आहे, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाला समाजात फूट पाडूनच सत्तेत यावे लागते असे सांगतानाच आम्ही त्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा निषेध करतो.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आपल्या 'X'वर पोस्टमध्ये म्हटले आहे की, "काँग्रेसला पाकिस्तानमधून निवडणूक लढवायची आहे, म्हणूनच त्यांनी एक जाहीरनामा तयार केला आहे जो बहुपत्नीत्व, तिहेरी तलाकसारखे काळे कायदे परत आणेल." दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार असून आसाममध्ये पहिले तीन टप्पे १९ एप्रिलला. २६ एप्रिल आणि ७ मे रोजी मतदान होणार आहे. ६ जून रोजी येथे निकाल लागणार आहे.