हनुमान चालीसा लावली म्हणून कट्टरपंथीयांकडून मारहाण; पीडित मुकेशविरोधातच 'महजबीन'ने दाखल केली तक्रार

07 Apr 2024 12:37:26
 Hanuman Chalisa
 
बंगळुरू : स्पीकरवर हनुमान चालीसा लावल्यामुळे दि. १७ मार्च २०२४ रोजी मुकेश यांना कर्नाटकातील बेंगळुरू येथे त्यांच्या दुकानात घुसून मारहाण करण्यात आली होती. 'नमाज'च्या वेळी ते त्याच्या दुकानात हनुमान चालिसा ऐकत होते. त्यामुळे कट्टरपंथींयाकडून त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यातच आता मेहजबीन नावाच्या महिलेने पीडित मुकेशविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
 
मेहजबीन ही सुलेमानची आई असल्याचे सांगण्यात येत आहे. सुलेमानवर मुकेशवर हल्ला करण्याचा आरोप आहे. एफआयआरमध्ये मुकेशवर मोठ्या आवाजात संगीत वाजवून नमाजींचा छळ केल्याचा आणि समजावण्यास गेलेल्या सुलेमान आणि इतरांवर हल्ला केल्याचा आरोप मुकेशवर ठेवण्यात आला. मेहजबीनच्या तक्रारीवरून कर्नाटक पोलिसांनी पीडित मुकेशविरुद्ध दि. २७ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे.
 
हे वाचलंत का? -  चहामध्ये गुंगीचे औषध टाकून ऑटोचालक 'सज्जाद'ने केला पीडित महिलेवर बलात्कार
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेहजबीनने दि. १८ मार्च रोजी बेंगळुरूमधील हलसूरू गेट पोलिस स्टेशनमध्ये मुकेशविरोधात तक्रार दाखल केली होती. जवळच्या मशिदीत नमाज सुरू असताना मुकेश मोठ्या आवाजात संगीत वाजवत होता, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सुलेमानने त्याच्या साथीदारांसह जाऊन याबाबत विचारणा केली असता मुकेशने त्यांच्यावर हल्ला केला. या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र अहवाल नोंदवला होता. त्यानंतर तक्रारदाराने मुकेशवर कारवाई करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या सूचनेनुसार, मुकेशविरुद्ध दि. २७ मार्च रोजी हलसूरू पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.
 
मेहजबीनने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, मुकेशच्या संगीतामुळे रमजानच्या काळात मशिदीत नमाज अदा करणाऱ्या ३००० नमाज्यांना त्रास झाला होता. मुकेशने आपल्या मुलाला शिवीगाळ केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तिने केला आहे. मुकेशविरुद्ध आयपीसी कलम ३२३ (दुखापत करणे), ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतूने मुद्दाम मतभेद निर्माण करणे) आणि ५०६ (धमकी देणे) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
 
हे वाचलंत का? -  हिंदुद्वेषी मौलाना तौकीरला परदेशातून फंडीग? निदा खान यांनी केली ED चौकशीची मागणी
 
पोलिसांनी अद्याप मुकेशवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यातही बोलावण्यात आलेले नाही. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सुलेमान, शाहनवाज, रोहित, दानिश, तरुणा आणि मुकेशच्या एफआयआरमधील इतर आरोपींची काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटका झाली आहे. मेहजबीनच्या तक्रारीवर पोलीस तपास करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0