“मी फक्त माझ्या...”, निवडणुकीत उतरणार का? सचिन पिळगांवकरांनीच दिले उत्तर

06 Apr 2024 18:06:17

sachin  
 
 
मुंबई : देशात सध्या लोकसभा निवडणूकांची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक कलाकारांनी मनोरंजन क्षेत्रासह आता राजकारणातही प्रवेश केला आहे. तसेच, लोकसभा निवडणूकीसाठी विविध जागांवरुन काही कलाकारांची वर्णी लागली आहे. भाजपकडून कंगना रणावत, अरुण गोविल या कलाकारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. आता आणखी एक मराठी कलाकार निवडणूकीच्या रिंगणात उतरणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) आता राजकारणात प्रवेश करत थेट निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु झाली असून यावर स्वत: सचिन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
सचिन पिळगांवकरांनी काय म्हटलं?
 
सचिन पिळगांवकरांनी फेसबुक पोस्ट करत या सगळ्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, “ मी लोकसभा निवडणुकीत उतरतोय ही अफवाह माझ्या कानावर ही आली, मी हसलो, एवढच सांगू शकतो की मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी फक्तं आहे माझ्या प्रेक्षकांचा. ६१ वर्ष. आपला,सचिन पिळगांवकर.
 

sachin  
 
त्यामुळे सचिन पिळगांवकर यांच्या पोस्टमुळे त्यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना पुर्णविराम लागला आहे. सध्या सचिन पिळगांवकर नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाच्या शुटमध्ये व्यस्त असून लवकरच चित्रपट भेटीला येणार आहे.
Powered By Sangraha 9.0