...तर मी मुंबई सोडून KKR चा कॅप्टन होणार : रोहित शर्मा

06 Apr 2024 16:59:36
Rohit Sharma captaincy


मुंबई :   
  आयपीएल २०२४ मोसमात रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आले असून ऑलराऊंडर हार्दिक पंड्याकडे नेतृत्व देणयाचा निर्णय फ्रॅंचायझीकडून घेण्यात आला. यानिर्णयामुळे हिटमॅन रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. या नाराजीबाबत सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता रोहित शर्माचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


या व्हिडीओत रोहित शर्माला आयपीएलमधील कप्तानीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त अन्य कुठल्या संघाचे कर्णधारपद स्वीकारशील. या प्रश्नाला उत्तर देताना हिटमॅनने म्हटले होते की, कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नाव घेतले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्समधून बाहेर पडल्यास रोहित शर्मा केकेआरमध्ये दिसणार का, यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत.


हे वाचलंत का? - मालदीवसोबत मैत्रीचा नवा अध्याय, भारताच्या कूटनीतीमुळे चीन बॅकफूटवर!


दरम्यान, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. गुणतालिकेत मुंबई इंडियन्स शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते रोहित शर्माच्या कॅप्टन्सीला मिस करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. तसेच, रोहित शर्माला कर्णधारपदावरून बाजूला केल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाची फॅन फॉलोअिंगदेखील लाखांनी कमी झाली होती.

आता टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माला मुंबई इंडियन्स संघाच्या कप्तान बदलानंतर पुढील वर्षी संघ सोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर, पुढील मोसमात रोहित शर्मा लिलावात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हिटमॅनच्या या निर्णयामुळे अनेक संघमालक त्याच्यावर मोठमोठ्या बोली लावण्याचे अंदाज आतापासून क्रिकेट वर्तुळात लावण्यात येत आहेत. विशेष म्हणजे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर संघातील बरेच जण नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0