सेमीकंडक्टर निर्मितीत भारताचा मोठा सहभाग

06 Apr 2024 13:01:42


Semiconductor
 
 
मुंबई: सरकारने सेमीकंडक्टर निर्मितीत विशेष लक्ष दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने 'मिशन सेमीकंडक्टर' सुरू केले असताना देशात सेमीकंडक्टर कंपन्यांनी भारतात आपली गुंतवणूक करून प्रकल्प सुरू केले होते. यासाठी सरकारने विशेष पीएलआय (Production Linked Incentives) योजनेची घोषणा करत सेमीकंडक्टर निर्मिती कंपन्यांना इन्सेक्टिव्ह देऊ केले होते. याच धर्तीवर नासकॉम झिनोव (Nasscom Zinnov) अहवाल समोर आला आहे.
 
या अहवालात म्हटले आहे की भारतातील सेमीकंडक्टर निर्मितीत भरभराट आली आहे. जगातील एकूण सेमीकंडक्टर उत्पादनासाठी लागणाऱ्या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरपैकी (Global Capability Centres) ३० टक्के सेंटर भारतात असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे. यामध्ये लागणारी आवश्यक कौशल्यविकास भारतात उपलब्ध आहे. सेमीकंडक्टर डिझाईन, परफॉर्मन्स टेस्टिंग यासाठी लागणारी कौशल्ये विकास भारतात उपलब्ध होत आहेत अनेक होतकरू तरूणांना या क्षेत्रात रस निर्माण झाला असल्याचे नासकॉम झिनो अहवालात म्हटले आहे.
 
या उत्पादन क्षेत्रात नवनवीन कंपनीची भर पडत आहे. यामध्ये सिग्नेचर आयपी (Signature IP) कंपनीचा देखील समावेश झाला आहे. ही कंपनी २०२१ मध्ये स्थापन झालेली होती. याशिवाय एजकोरट्रिक्सने (EdgeCortix ) आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित आकिर्टेकचर प्रणाली विकसित केली आहे. तसेच एम ३१ (M31) चे सेंटर बंगलूरू येथे आहे. ही कंपनी आयसी डिझाईन व डेव्हलपमेंट करते .
 
या अहवालात म्हटल्यानुसार, वैश्विक सेमीकंडक्टर पातळीवर २.३ कौशल्य विकसित मनुष्यबळ आहे. त्यातील युएस, भारत, चीन या तीन देशात त्यापैकी ५० टक्के कौशल्य विकसित मनुष्यबळ आहे.अहवालात म्हटल्याप्रमाणे त्यातील बंगळुरू व हैद्राबाद येथे २/३ सेमीकंडक्टरचे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर अस्तित्वात आहेत.
 
Nasscom-Zinnov अहवालात असे म्हटले आहे की GCCs (ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर) त्यांच्या भारतातील केंद्रांना ट्रान्सफॉर्मेशन हबमध्ये बदलत आहेत, चिप्सच्या डिझाईनिंग आणि विकासावर काम करत आहेत, फॅब्रिकेशन आउटसोर्स करून स्पेशलाइज्ड फाऊंड्रीमध्ये. मायक्रोनच्या इंडिया सेंटरने व्यवसाय, ग्राहक आणि गेमिंगमधील विविध अनुप्रयोगांसाठी 1 TB 232-लेयर 3D TLC NAND फ्लॅश मेमरी चिप तयार केली आहे. मायक्रोनने साणंदमधील सेमीकंडक्टर चिप असेंबली आणि चाचणी सुविधेसाठी $2.7 अब्ज गुंतवणुकीची तयारी केली आहे.
 
जगभरात नावाजलेल्या कंपन्यांमध्ये इंटेल, टेक्सास इन्स्ट्रुमेंट, एएमडी , क्वालकॉम, एनविडीया यांचा समावेश आहे. या कंपनीची स्वतः ची आर अँड डी (Research and development) केंद्रे भारतात अस्तित्वात आहेत. यामुळे आगामी काळात सेमीकंडक्टर उत्पादनात भारताचा महत्वपूर्ण भाग असल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.
 
Powered By Sangraha 9.0