सोने चांदी पुन्हा महागली सोने ७१२९० चांदी ८३५०० रुपये १ किलो

06 Apr 2024 11:10:33

Gold
 
मुंबई: काल रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कुठलाही बदल केला नाही. भारतातील विदेशी मुद्रेतही मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत होते. कालपर्यंत स्वस्त झालेले सोने आज पुन्हा महागले आहे. आज देशातील सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम सोने १२०० रुपयांनी वाढत ६५३५० रूपयावर पोहोचले आहे. तर २४ कॅरेट सोन्याच्या भावात १० ग्रॅममध्ये १३१० रुपयांनी वाढ होत ७१२९० रुपयांवर पोहोचले आहे.
 
मुंबईत २२ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम सोन्याच्या किंमतीत १२० रुपयाने वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम १२० रुपयांनी व १० ग्रॅम सोन्याच्या भावात १२०० रुपयांनी वाढ होत सोने ६५३५० रुपयांवर पोहोचले आहे. २४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम सोने किंमत १३१० रुपयांनी वाढत ७१२९० रूपयावर किंमत पोहोचली आहे.
 
चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. १ किलो चांदीची किंमत १८०० रुपयांनी वाढत ८३५०० रूपयांवर पोहोचला आहे. चांदीत प्रति ग्रॅमवर १.८० रुपयांनी वाढ झाली आहे. याशिवाय नागपूरमध्ये ८३५ रूपये, नाशिकमध्ये ८३५ रुपये, पुण्यात ८३५ रुपये प्रति १० ग्रॅम चांदीत वाढ झाली आहे. स्पॉट गोल्डमध्ये १.७९ टक्क्याने सकाळपर्यंत वाढ झाली आहे. तर चांदीचा किंमतीत २.४८ टक्क्याने वाढ झाली आहे.
 
Powered By Sangraha 9.0