मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( nana patole ) यांनी पुन्हा प्रकाश आंबेडकरांना युती करण्याची साद घातली आहे. अजुनही वेळ गेलेली नाही. आपल्याकडे अर्ज मागे घेण्यापर्यत वेळ आहे अस त्यांनी प्रकाश आंबेडकरांना उद्देशुन म्हटलं आहे. अकोल्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असताना नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलं.
वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडी करण्याचे आम्ही प्रयत्न केले. आम्ही शेवटपर्यंत अकोल्यात उमेदवार दिला नव्हता. पण तरीही प्रकाश आंबेडकरांनी आपले उमेदवार जाहीर केले. अजुनही वेळ गेलेली नाही पण तुमच्या मनात शंका आहे. असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर आणखी तुमच्यासाठी वेळ गेलेली नाही. महाराष्ट्रात २ ३ कीती जागा पाहीजेत सांगा. मी पुढाकार घेतो. तुमच्या भुमित येऊन सांगतो आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसांपर्यंत वेळ आहे. त्यानंतर खरी लढाई सुरु होणार आहे. असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, अनेक दिवस वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीत येण्याच्या चर्चा होत्या. महाविकास आघाडीच्या बैठकीलाही प्रकाश आंबेडकर हजर होते. प्रकाश आंबेडकरांना १२ जागा हव्या असल्याच्या चर्चा होत्या. पण महाविकास आघाडीत वंचितवरुन एकमत होऊ शकले नाही. वंचितने आता सर्व जागांवर आपले उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेसला मागिल निवडणुकीत वंचित मुळे मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले होते. आठ ते दहा ठीकाणी मतांच्या विभाजनाचा फटका काँग्रेसला बसला होता. वंचितची एकगठ्ठा मते ही काँग्रेसची पारंपारीक मते आहेत असं मानलं जातं त्यामुळे काँग्रेस पक्षाला वंचित सोबत नसण्याने होणाऱ्या नुकसानाची जाणिव आहे. त्यामुळे नाना अजुनही प्रकाश आंबेडकारांसोबत युती करण्यात प्रयत्नशील आहेत असं बोललं जात आहे.