टेस्ला भारतात आणण्यासाठी तेलंगणा सरकारचे प्रयत्न सुरू

05 Apr 2024 12:36:13

tesla
 
 
मुंबई: तेलंगणा सरकारने टेस्लाचा प्रकल्प आपल्या राज्यात यावा यासाठी टेस्ला कंपनीशी बोलणी सुरू केली आहे.भारतातील प्रकल्प तेलंगणा राज्यात यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे तेलंगणाचे उद्योगमंत्री श्रीधर बाबूंनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
 
याबद्दल एक्सवर प्रतिक्रिया लिहिताना श्रीधर बाबू म्हणाले, 'डिसेंबर २०२३ पासून राज्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणूक यावी यासाठी राज्य सरकार इच्छूक आहे त्याचाच भाग म्हणून आम्ही टेस्ला कंपनीशी बोलणी करत आहोत असे सांगितले आहे.'
 
याविषयी अधिक माहिती लिहिताना बाबू म्हणाले की, 'आम्ही भारतातील टेस्लाच्या नियोजित गुंतवणूक उपक्रमांचा अभ्यास आणि मागोवा घेत आहोत.आम्ही काही काळापासून टेस्ला तेलंगणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.आमची टीम टेस्लासाठी सर्व प्रयत्न करून टेस्लाशी संवाद आणि चर्चा सुरू ठेवत आहे. तेलंगणा आपल्या उद्योगस्नेही धोरणासह, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करून प्रगतीशील आणि भविष्यवादी दृष्टीने काम करत आहे आणि bes सक्षम करण्यासाठी सोपी परवानगी प्रणाली आम्ही तयार करत आहोत.'
 
हा इलेक्ट्रिक कार प्रकलपाची किंमत २-३ युएस अब्ज डॉलर असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकल्पातून रोजगार निर्मितीत वाढ होऊन आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेली चारचाकी भारतात बनल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.
 
Powered By Sangraha 9.0