आता थर्ड पार्टी अँपमधून युपीआय व्यवहार करता येणार !

05 Apr 2024 14:40:49

RBI
 
 
मुंबई: आता प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंटसच्या (PPIs) माध्यमातून पेमेंट करण्यासाठी युपीआय सेवा वापरता येणार आहे. थर्ड पार्टीच्या माध्यमातून युपीय पेमेंट करता येणार असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी बोलताना सांगितले आहे.
 
आज पतधोरण समितीच्या बैठकीतील निकालावर बोलताना त्यांनी हा नवी निर्णय जाहीर केला आहे.आता व्यक्ती प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंटसचा वापर डिजिटल वॉलेटसारखा करता येणार आहे. केवळ इश्यूअरचे अँप वापरण्याचे निर्बंध काढत आता थर्ड पार्टी अँपमधून व्यवहार करता येणार आहेत.
 
'सध्या पीपीपी पेमेंट केवळ वेब व अँपमार्फत केवळ पीपीपी इश्यूअर यांच्या अँपमार्फत व्यवहार करणे शक्य आहे परंतु आता नवीन प्रस्तावानुसार थर्ड पार्टीमधून व्यवहार करणे शक्य होणार आहे ' असे दास म्हणाले आहेत.
 
'यामुळे ग्राहकांच्या चांगल्या अनुभवासाठी मदत होणार असून डिजिटल पेमेंट प्रणालीसाठी या निर्णयाने चालना मिळणार आहे खासकरून छोट्या व्यवहाराकरता यामुळे सोईस्कर पेमेंट करणे शक्य होणार आहे ' असेही गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सांगितले आहे.
 
Powered By Sangraha 9.0