अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून कायमचा बाहेर येणार

05 Apr 2024 13:22:31
arun gawali
 
मुंबई: कुख्यात गुंड अरुण गवळी अरुण गवळी तुरुंगातुन कायमचा बाहेर येणार आहे. ( Arun Gawali released ) नागपुर खंडपीठाने अरुण गवळीची मुदतपुर्व सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. अरुण गवळीने न्यायालयाकडे २००६च्या शासन निर्णयानुसार सुटकेची मागणी केली होती. त्यावर कोर्टाने निकाल सुनावला आहे.
 
कोर्टांने जेल प्रशासनाला यावर उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. जेल प्रशानाच्या निर्णयावर आता सर्वांचे लक्ष आहे. २००६ च्या शासन निर्णयानुसार वयाची ६५ वर्षे पुर्ण केलेल्या आणि अर्धी शिक्षा भोगलेल्या कैद्यांना शिक्षेत सुट देता येते. त्यानुसार अरुण गवळींच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती.

हे वाटलत का ? - सांगली आणि मुंबई नंतर आता भिवंडीतही काँग्रेसचा पत्ता कट; शरद पवारांनी केला उमेदवार जाहीर
 
मुंबईतील नगरसेवक कमलवाकर जामसांडेकर यांची हत्या आणि आणखी काही गुन्ह्यांसाठी अरुण गवळीला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा मिळाली होती. अरुळ गवळी सध्या नागपुरच्या तुरुंगात ही शिक्षा भोगत आहे. २००६ च्या शासन निर्णयानुसार अरुण गवळी शिक्षेतुन सुट मिळण्यास पात्र होत आहे.
 
अरुण गवळीचा १९५५ ला झाला. तो आत्ता ६९ वर्षांचा आहे. २००७ साली अरुण गवळीला दोषी ठरवून दोन जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. त्यानुसार १६ वर्षे अरुण गवळी तुरुंगात आहेत. त्यामुळे सुटकेसाठी आवश्यक असलेल्या अटी मध्ये अरुण गवळी बसत आहे. त्यामुळे आता जेल प्रशासनाच्या निर्णयानंतर अरुण गवळीची कायमस्वरुपी सुटका होण्याची शक्यता आहे.

Powered By Sangraha 9.0