हेमा मालिनींच्या प्रचार सभेत योगींचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले- ६० वर्ष मथुरेचा विचार...

    04-Apr-2024
Total Views |
Yogi Adityanath On Congress


लखनौ
: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दि. ४ एप्रिल २०२४ रोजी मथुरेत एका जाहिर सभेला संबोधित केले. मथुरेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा एकदा अभिनेत्री हेमा मालिनी यांना उमेदवारी दिली आहे. ‘राधे-राधे’ आणि ‘बिहारी लाल की जय’च्या घोषणांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कृष्णांच्या मथुरेत आपल्या भाषणाला सुरुवात केली. तसेच काँग्रेसने देशावर ६० वर्ष राज्य करून ही कधीच काशी किंवा मथुरेचा विचार का केला नाही, असा सवाल ही त्यांनी विचारला.

यावेळी ते म्हणाले की, “अयोध्या, मथुरा आणि काशीमध्ये यावेळी मथुरेत पहिली निवडणुक होत आहे. त्यामुळे इथून संदेश गेला पाहिजे. प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान झालेले आहेत. काशीचेही काम झालेले आहे. आता मथुरा बाकी आहे." योगी म्हणाले की, सपा- बसा आणि काँग्रेस आमच्या आस्थेचा सन्मान करू शकत नाहीत, तर त्यांना देशाचा भार उचलण्याची गरज नाही.
 
तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “भगवान श्रीकृष्णाबद्दल सांगितले जाते की त्यांना १६ कलांसह अवतार घेतला होता. त्यात आज कलाविश्वातील हेमा मालिनी या लोकसभा मतदारसंघात मैदानात आहेत.भगवान श्री कृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरा जिल्ह्यातील मतदार एक-एक मत भाजपच्या कमळाच्या चिन्हाला देणार आहेत. त्यामुळे हेमा मालिनी यांच्यावर राधारानी आणि भगवान कृष्णांचा आशीर्वाद आहे.

तसेच योगी म्हणाले की, “हेमा यांनी या क्षेत्राला नवी ओळख दिली आहे. हेमा मालिनी यांनी भारताच्या नृत्य संस्कृती आणि सिनेमा संस्कृतीला जगभरात ओळख मिळवून दिली. काँग्रेसवाल्यांना याचे वाईट वाटते. त्यामुळे देवसुद्धा त्यांना वाचवू शकेल की नाही अशी शंका आहे. कोणत्याही पक्षाचा उमेदवार शोधूनही सापडत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यांची आयारामांवर मदार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या कानाकोपऱ्यातून मोदीच्या समर्थनार्थ आवाज येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मजबूत मोदी सरकार स्थापन करण्याची शपथ घ्या, असे आवाहन ही त्यांनी केले.

विद्यमान खासदार हेमा मालिनी यांचे कौतुक करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, काँग्रेसने देशावर ६० वर्ष राज्य करून ही कधीच काशी किंवा मथुरेचा विचार केला नाही. त्यामुळे काँग्रेसने काशीचा विचार का केला नाही? , असा सवाल ही त्यांनी विचारला. दरम्यान मथुरेतील विकासकामे हेमा मालिनी यांच्या सूचनांआधारे झाल्याचे ही योगींनी सांगितले.