Q4 तिमाही निकाल : देशातील सर्वात मोठी खाजगी बँक मजबूत स्थितीत !

HDFC बँकेच्या YoY बेसिसवर उत्पन्नात ५५.४ टक्क्याने वाढ

    04-Apr-2024
Total Views |

HDFC Bank
 
 
मुंबई: भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळख असणाऱ्या एचडीएफसी बँक (HDFC Bank) ने आपला नवीन तिमाही निकाल जाहीर केला आहे. बँकेला इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीच्या उत्पन्नात ५५.४ टक्क्याने वाढ झाली आहे. मागील १६.१४ लाख करोडच्या तुलनेत यावर्षी २५.०७ लाख कोटींचे कर्जवाटप बँकेने केले आहे.३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कर्जवाटपात १.६ टक्क्याने वाढत २४.६९ लाख कोटींवर वाढ पोहोचली आहे.
 
बँकेने दिलेल्या माहितीनुसार,३१ मार्च २०२३ पर्यंत किरकोळ कर्ज वितरणात १०८.९ टक्क्याने वाढ झाली आहे तर डिसेंबर २०२३ पर्यंत ३.७ टक्क्याने वाढ होत कर्जवाटप ४३७०० कोटींपर्यंत पोहोचले आहे.
 
एचडीएफसी बँकेच्या ठेवीत (Deposit) मागील १८.८३ लाख कोटींच्या तुलनेत २६.४ टक्क्याने वाढ होत ठेवीची रक्कम २३.८० लाख कोटींवर पोहोचली आहे.तिमाही बेसिसवर मुदत ठेवीत ७.५ टक्क्याने वाढ झाली आहे.
 
बँकेच्या कासा (CASA) ठेवीची संख्या ३१ मार्चपर्यंत ९.०९ लाख कोटी रुपये आहे. मागील वर्षातील मार्चच्या तुलनेत ठेवीत ८.४ टक्क्याने वाढ होत ९.०९ लाख कोटींवर ठेवी पोहोचल्या आहेत. इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ठेवीत मागील वर्षाच्या तुलनेत ८.८ टक्क्याने वाढ झाली आहे.
 
निकाल जाहीर झाल्यानंतर सकाळच्या सत्रात एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये ३ ते ५ टक्क्याने वाढ झाली होती.