“तुमचा अभिमान होणार नाही याची…” प्रिया-उमेशला एका दिग्दर्शकाने दिलेला हा सल्ला

Total Views |
मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकं कपल उमेश कामत आणि प्रिया बापट यांचा एक खास किस्सा... 
 

priya umesh  
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक आयडियल कपल. मैत्री ते लग्न असा प्रवास करणाऱ्या प्रिया आणि उमेशला चक्क एका दिग्दर्शकाने तुमचा अभिमान होणार नाही ना याची काळजी घ्या असा सल्ला दिला होता. याचा किस्सा उमेश कामत (Umesh Kamat) याने ‘महाएमटीबी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. नुकताच उमेश ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या चित्रपटात झळकला होता. तर आगामी ‘मायलेक’ या चित्रपटातही तो खास भूमिकेस दिसणार आहे.
 
उमेश आणि प्रिया मनोरंजनसृष्टीत काम करणारी जोडी. त्यामुळे ट्रोलर्स किंवा लोकांचे टोमणे यांचा सामना त्यांनी केलाच असेल. याबद्दल बोलताना उमेश म्हणतो, “आमचं जेव्हा लग्न ठरत होतं तेव्हा प्रिया ज्या मालिकेत काम करत होती त्या दिग्दर्शकांना आमच्या नात्याबद्दल समजलं होतं आणि आम्ही लग्न करणार आहोत हे देखील माहित होतं. त्यावेळी ते दिग्दर्शक असं म्हणाले होते की बघा हा तुमचा अभिमान होता कामा नये. कारण एकाच क्षेत्रात काम करत असताना तुमची प्रगती लोकांच्या डोळ्यात खुपत असते. त्यामुळे मग ट्रोल करणं किंवा काड्या टाकणं या गोष्टी होतच असतात; मात्र, आम्ही याकडे लक्ष न देता आमच्या करिअरच्या वाटा निवडून त्यावर चालत सुटलो”.

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.