कार्तिक आर्यन घेतोय मराठी भाषेचे धडे!

    04-Apr-2024
Total Views |
'चंदू चँपियन'मध्ये मराठी बोलताना दिसणार कार्तिक आर्यन! भाषा शिकण्यासाठी घेतली तब्बल १४ महिने मेहनत
 
chandu champion  
 
मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) आजवर विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नव्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अक्षय कुमार अशीच जणू काही त्याची ओळख झाली आहे. 'प्यार का पंचनामा', 'भूल भूलैय्या २', 'लव्ह आज कल' या सुपरहिट चित्रपटांनतर आता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) चक्क मराठी भाषा शिकत आहे. कार्तिकचा बहुचर्चित चित्रपट 'चंदू चँपियन' लवकरच भेटीला येणार असून यात कार्तिकचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळणार आहे.
 
'चंदू चँपियन' चित्रपटाच्या निमित्ताने कार्तिक पहिल्यांदाच एका हटके भूमिकेत दिसणार आहे. त्याचे पात्र परफेक्ट दिसावे यासाठी तो मेहनत घेत असून या चित्रपटात तो मराठीत बोलताना दिसणार आहे. मराठी भाषेचे उच्चार अगदी योग्य यावे यासाठी कार्तिक १४ महिने मराठी भाषा शिकण्यासाठी घेतले. मराठी भाषा नीट बोलता यावी यासाठी एक प्राध्यापक कार्तिकला मराठीचे धडे देत होते.
 
 
 
एक हिंदी भाषिक कलाकार मराठी भाषा शिकण्यासाठी करत असलेली मेहनत आणि त्याची चिकाटी कार्तिकच्या चाहत्यांना नक्कीच भूरळ पाडेल. दरम्यान, साजिद नाडियादवाला आणि कबीर खान निर्मित 'चंदू चँपियन' चित्रपट १४ जून २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.