भारतात सेवा क्षेत्रात मोठी वाढ !

फेब्रुवारी महिन्यातील ६०.६वरून मार्च महिन्यात निर्देशांक ६१.२ वर

    04-Apr-2024
Total Views |

pmi
 
 
मुंबई: एस अँड पी ग्लोबलने एचएसबीसी इंडिया ग्लोबल मॅनेजर इंडेक्सचा मार्च महिन्यातील अहवाल पुढे आला आहे. या आकडेवारीत सांगितल्याप्रमाणे भारतात सेवा क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या सर्विसेसच्या मागणीमुळे ही वाढ झाल्याचे या निर्देशांकात म्हटले गेले आहे.
 
फेब्रुवारी महिन्यातील ६०.६ मधील तुलनेत मार्च महिन्यात सेवा निर्देशांकात वाढ होत ६१.२ वर पोहोचला आहे. वाढलेल्या सेवांचे नेटवर्क , व्यवसायांचे वृदधीकरण या कारणांमुळे भारताच्या उत्पादनात १६ वर्षातली सर्वाधिक वाढ झाली होती. ज्यामध्ये फेब्रुवारी ६०.६ निर्देशांकातील तुलनेत मार्चमध्ये ६१.८ निर्देशांकात उत्पादन निर्देशांक पोहोचला होता.
 
मार्चमध्ये दाखवलेल्या आकडेवारीत, सेवा क्षेत्रातील रोजगार संधी सर्वाधिक वाढली असल्याचे म्हटले आहे. गेल्या ७ महिन्यात ही वाढ सर्वाधिक झाली आहे. याशिवाय भारताच्या निर्यातीत रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे. पीएमआय निर्देशांकात ५० आकड्यावर म्हणजे व्यवसाय वृद्धींगत होण्याचे लक्षण असते. सलग ३२ महिन्यात सेवा क्षेत्रात वाढ झाल्याचे या निर्देशांकात म्हटले आहे.
 
एचएसबीसीतील अर्थतज्ज्ञांच्या मते, भारतातील सेवा क्षेत्रात मार्च महिन्यात वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत ही वाढ अधिक झाली आहे. मुख्यतः सेवेच्या मागणीत व विक्रीत झालेल्या वाढीमुळे निर्देशांक वाढला आहे.
 
याशिवाय ऑगस्ट २०२३ नंतर सेवा क्षेत्रातील रोजगार निर्मितीत सर्वाधिक वाढ सेवा क्षेत्रात झाली आहे. अहवालात म्हटल्याप्रमाणे हे आर्थिक वर्ष व्यापार उद्योगांसाठी व सेवा क्षेत्रातील व्यवसायांसाठी सकारात्मक राहिले आहेत. अहवालानुसार या क्षेत्रातील किंमतीत २०१७ नंतर सर्वाधिक वाढ झाली आहे. वाढलेल्या मागणी व वाढलेल्या सेवेच्या मूळ किंमतीमुळे ग्राहकांना या महागलेल्या सेवा ग्रहण कराव्या लागल्या आहेत.